काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष हवा, ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचे मत

काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी कायमस्वरूपी अध्यक्ष मिळायला हवा. सध्य ती गरज प्रकर्षाने जाणवत असल्याचे मत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. तसेच माझ्यासारख्या जुन्या नेत्यांची ही मागणी लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसला अद्याप कायमस्वरूपी अध्यक्ष मिळालेला नसल्याने सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. याआधीही त्यांनी यशस्वीपणे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले आहे. पण आता त्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करत असल्याने पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. पण ते इच्छुक नसतील तर आता आम्हाला अध्यक्षपदासाठी पर्याय शोधावा लागेल. त्याला गती यायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

नुकत्याच गोव्यात झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत युवक काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांची पक्षाचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता, असेही थरूर यांनी स्पष्ट केले आहे. केरळमध्ये पक्षाने नव्या नेतृत्वाला संधी दिली असून त्याचे लवकरच चांगले परिणाम दिसून येतील, पक्षाला बळकटी मिळेल, असेही थरूर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या