कॉँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच, थरूर, गेहलोत, दिग्विजय सिंह, मनीष तिवारी निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत

congress

कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर कॉँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. शशी थरून, अशोक गेहलोत यांच्यापाठोपाठ कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, माजी पेंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी अध्यक्षपच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

कॉँग्रेसच्या अध्यक्षपदापासून राहुल गांधी दूर पळत असले तरी राहुल यांच्या नावावरच मतैक्य होईल अशी चर्चा आत्तापर्यंत होती. कॉँग्रेसच्या जी-23 गटातील शशी थरूर यांनी सर्वप्रथम कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची परवानी मागितली. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पत्रकारांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह यांनीदेखील आपण स्वतः अध्यपदासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केले आहे. मनीष तिवारी यांनी उमेदवाराला निवडणूक लढण्यासाठी अनुमोदक आवश्यक असणाऱया डेलिगेट्सच्या भेटीगाठी सुरू केल्याने कॉँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा वाढल्याची चर्चा आहे.

एक व्यक्ती एक पद नियम लागू – राहुल गांधी

अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षांचे पद एक व्यक्ती-एक पदाच्या कक्षेत येत नसल्याचे म्हटले होते. त्यावर कॉँग्रेस नेते राहुल गांधी कॉँग्रेसच्या उदयपूर येथील शिबिरात एक व्यक्ती एक पद निर्णय लागू करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. हा निर्णय यापुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.