कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रेमी युगलाचा मृतदेह

प्रेमी युगलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना चंद्रपूर परिसरातील अजयपूर गावात घडली आहे. या घटनेने  संपूर्ण परिसरात खळबळ पसरली आहे.

चंद्रपूर मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळील जंगलात प्रेमयुगलांचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीस घटना स्थळी पोहचले, पंचनामा करून मृत प्रेमीयुगलांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्रेमीयुगलाची ओळख पटली असून हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रमणगट्टा गावातील असून त्यांचे नाव राजु होमदेव आत्राम (22) आणि सलोनी रामकृष्ण मडावी (18) असे आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या