सोनेवाडी गावातील विहिरीत महिलेचे प्रेत सापडले

परभणी जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावात विहिरीत 38 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सीमा बाबासाहेब लांडगे रा. नगदवाडी, सोनेवाडी कोपरगाव असे मयत महिलेचे नाव आहे.

या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना दगडू मोहन गुडगे (पोलीस पाटील) सोनेवाडी यांनी दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेती महामंडळाच्या विहिरीत सोनेवाडी शिवारात एका महिलेचे प्रेत विहिरीत तरंगताना दिसले. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कुसारे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या