शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम वेगाने होणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

गोवंडीतील पंडित मदन मालवीय शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम वेग धरणार आहे. सध्या असलेली रुग्णालयाच्या इमारतीची जागा आणि नवीन रुग्णालयाच्या बांधकामासाठी आरोग्य खात्याच्या अखत्यारितील जागेबाबतची फाईल महापालिका उपायुक्त कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना एम पूर्व विभागाच्या प्रभाग अध्यक्षा निधी शिंदे यांनी पालिका अधिकाऱयांना केल्या. तसेच रुग्णांच्या संख्येनुसार पारिचारिका आणि सफाई कामगारांची संख्याही वाढवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. दरम्यान, ५८० खाटांचे सुसज्ज रुग्णालय व्हावे यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी आणि वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी निधी शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांसह शताब्दी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख प्रमोद शिंदे, महापालिका उपायुक्त धामणे, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाडेकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या