कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी, गेल्या 24 तासांत आढळले कोरोनाचे अडीच लाखहून अधिक रुग्ण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना दिसत आहे. असे असले तरी गेल्या 24 तासांत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 63 हजार 533 रुग्ण आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

गेल्या 24 तासांत देशात 4 लाख 22 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक मृत्यू झाले असून त्यांची संख्या 4 हजार 329 इतकी आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 2 लाख 78 हजार 719 वर पोहोचला आहे. सध्या देशात 33 लाख 53 हजार 765 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या