उत्तरकाशीतील मृतांची संख्या नऊवर

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सहस्रताल शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांच्या समूहातील अपघातातील मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे. थंडीमुळे गिर्यारोहकांच्या या समूहातील चार महिलांसह पाच जणांची प्रकृती खालावून मृत्यू झाला होता. यात आशा (71), सिंधू (45), सुजाता (51), चित्रा परिणित (48) आणि विनायक (54) अशी मृत्युमुखी पडलेल्या पाच गिर्यारोहकांची नावे आहेत. या गिर्यारोहकांचा समूहाचा गाईड आणि इतर चार जण अद्याप बेपत्ता आहेत. परंतु हे जीवित असण्याची शक्यता कमी आहे. हवाई दलाने शोध आणि बचाव मोहीम चालू ठेवली.