बिहारमधील बालमृत्यू ही आपल्यासाठी शरमेची बाब: पंतप्रधान मोदी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहारमध्ये मेंदूज्वराने आतापर्यंत 150 हून बालकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मोदींनी ही बाब आपल्यासाठी शरमेची असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

मोदी म्हणाले की, “बिहारमध्ये मेंदुज्वराने बालकांचा मृत्यू होणे हे दुर्दैवी आहे, तसेच ही आपल्यासाठी अतिशय शरमेची बाब आहे. यासाठी आपण आता कडक पावलं उचलली आहेत. मी राज्य सरकारच्या संपर्कात आहे आणि या संकटातून आपण लवकरच बाहेर येऊ.”

आयुषमान भारत ही योजना आपण अधिक चांगल्या प्रकारे राबवण्याची ही योग्य वेळे आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच देशाच्या गरीब जनतेला योग्य दरात चांगले उपचार मिळाले पाहिजे असेही मोदींनी नमूद केले.