नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस सेवा

सध्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. टेलिमानस या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लॅण्डलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.