आदिवासी विभागातील आठवी ते बारावीच्या वर्गाचे दरवाजे उघडणार, 2 ऑगस्टपासून शाळेची घंटा वाजणार

कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना वाढलेले बाल विवाह, बाल मजुरी व विविध सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 ऑगस्टपासून आदिवासी विभागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग व वसतिगृहे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे.

राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात आलेले शाळांचे वर्ग फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. त्यातून निर्माण झालेले प्रश्न लक्षात घेऊन 2 ऑगस्टपासून पुन्हा वर्ग सुरू करण्यात येणार आहेत , असे आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी सांगितले. त्यासाठी कोरोना प्रतिबंधक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या