‘एन्जॉय’ संघाला विजेतेपद

युनिटी फॉर प्रीडम फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ‘एन्जॉय’ संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. क्वार्टर गेट येथील अहिल्याश्रम महात्मा फुले शाळेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत दहा संघांनी सहभाग घेतला होता. पोलीसलाईन, एमपीएस, सिंहगड, नकरत्न, गकळीकाडा, शिकराज, एन्जॉय, एकता, एमजेपी, राजेकाडी या दहा संघांनी विजेतेपदासाठी कौशल्य पणाला लावले.