वेबसिरीजमध्ये पहिल्यांदाच दिसणार ‘हिंदुस्थानी स्पाय’, या अभिनेत्याची कडक एन्ट्री

727
amazon-prime-manoj-bajpai

वेबसिरीजच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सध्या सर्वच कलाकार आपलं नशिब वेबसिरीजमध्ये आजमावून बघत आहेत. याच यादीत आता आणखी एका बॉलीवूड अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. आपल्या अभिनयाने चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारा मनोज वाजपेयी आता वेबसिरीजमधून प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ ‘द फॅमिली मॅन’ ही वेबसिरीज येत्या 20 सप्टेंबर रोजी रिलिज करणार आहे. ही वेबसिरीज 10 एपिसोडची असून यामध्ये मनोज वाजपेयी हिंदुस्थानी गुप्तहेराच्या भूमिकेत दिसेल. ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजचं आणखी एक वैशिष्ट्य की, 200 हून अधिक देशात प्रदर्शित होणारी हिंदीमधील ही पहिलीच वेबसिरीज ठरणार आहे.

घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत करत जगणारा एक सामान्य माणूस आणि त्याच चेहऱ्यामागे लपलेला गुप्तहेर अतिरेक्यांना पकडतो ही कथा या वेबसिरीजमध्ये मांडण्यात आली आहे. राज निदीमोरू व कृष्णा डी.के. यांनी ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजचे दिग्दर्शन केलं आहे.

the-family-man

या सिरीजनध्ये मनोज वाजपेयीसह प्रियामणी, शरीब हाश्मी, नीरज माधव, दर्शन कुमार, गुल पनाग, श्रेया धनवंतरी, संदीप किशन, दिलीप तहिल, शरद केळकर, पवन चोप्रा, मीर सरवार या कलाकारांनी काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या