देवगडमध्ये नारळी पोर्णिमेचा सण उत्साहात साजरा

देवगड व आजूबाजूच्या परिसरात नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात सागराला श्री फळ अर्पण करून साजरा करण्यात आला. देवगड येथील बंदर परिसरात ठिकाणी शासकीय पूजा मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर पोलीस प्रतिनिधी पोलीस नाईक प्रवीण सावंत कस्टम अधिक्षक महेंद्र प्रताप ,निरीक्षक कुमार रुपम पटेल, बंदर विभागाचे प्रकाश खुडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे संदेश चोपडेकर, सागर सुरक्षा रक्षक संदेश नारकर, व्यापारी प्रतिनिधी आनंद रामाणे शैलेश कदम यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवगड बंदर या ठिकाणी ग्रामोपाध्ये विकास गोठोसकर यांनी विधिवत पौरोहित्य करून सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले.