एयरोनॉटिकल इंजिनीअरचे क्षेत्र विशेष आव्हानात्मक

25

सामना प्रतिनिधि ।

एअर इंडिया, इंडिगो, इंडियन एअरलाइन्स, स्पाइस जेट, ब्लू डार्ट आणि एशिया, एविएशनसारख्या एयरलाइन्स व्यतिरिक्त सरकारी उड्डाण विभागात एयरोनॉटिकल इंजिनीअरची आवश्यकता असते. या क्षेत्रात एयरोनॉटिक्स आणि स्पेस रिसर्च, डिफेन्स टेक्नॉलॉजी या शाखांविषयी विस्तृत माहिती दिली जाते. यामध्ये क्षेत्र डिझाइनिंग, निर्माण, विकास, परीक्षण, कमर्शियल आणि मिलिट्री एअरक्राफ्ट यासह अंतरिक्ष यान, उपग्रह, मिसाइलशी संबंधित अनेक तऱ्हेची काम करण्याची संधी मिळते.

महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था

  •  इंडियन ग्रुप ऑफ एयरनॉटिकल सायन्स, नवी दिल्ली
  • आयआयटी (खडगपूर, मुंबई, कानपूर)
  • इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ सायन्स, बेंगळुर
  • अकॅडमी ऑफ एरोस्पेस ऍण्ड एविएशन, इंदौर

रोजगाराच्या संधी

सरकारी किंवा एयरलाइन्स कंपन्या, विमान बनवणाऱ्या कंपन्यां यामध्ये दक्ष एयरोनॉटिकल इंजिनीअर वाव आहे. नॅशनल एयरोनॉटिकल प्रयोगशाळा, एयरोनॉटिकल डेव्हलपमेंट संस्था, नागरिक उड्डयन विभाग, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्रो)यामध्ये रोजगाराची संधी मिळते. विमानाचे डिझाइन, विकासाशी संबंधित क्षेत्रातही काम करता येते. शिवाय या विभागाशी संबंधित प्रबंधकीय आणि शैक्षणिक पदांवरही निवड होऊ शकते.

परदेशात शिक्षणाची संधी

परदेशी विश्वविद्यालयांमध्ये एयरोनॉटिकल इंजिनीअर्ससाठी अंडरग्रॅज्युएट स्तरावरील कोर्स उपलब्ध आहेत. यामध्ये अरिजोना स्टेट युनिव्हर्सिटी, एम्ब्री-रिडल एयरोनॉटिकल युनिव्हर्सिटी, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास यांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त एयरोस्पेस इंजिनीअर हा कोर्सही येथे करता येतो. अंडरग्रॅज्युएट स्तरावरील कोर्स करण्यासाठी एसएटी (सॅट) आणि टीओईएफएल (टॉफेल)पास होणे आवश्यक आहे आणि पदवीस्तरावर प्रवेश घेण्यासाठी जीआरई किंवा टॉफेल पास व्हावे लागते.

व्यक्तिगत योग्यता

एयरोनॉटिकल इंजिनीअर या शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तम निरीक्षणक्षमता आणि एखादी समस्या सोप्या पद्धतीने सोडवण्याची कला असली पाहिजे. याकरिता मॅन्युअल, टेकल आणि मेकॅनिकल या तिन्हींची समज असणं आवश्यक आहे. यासह तार्किक क्षमता आणि संगणकाचेही योग्य ज्ञान असावे. महत्त्वाचे म्हणजे शारीरिकदृष्टय़ा एयरोनॉटिकल इंजिनीअर सुदृढ असावा. कारण विमानातील प्रवाशांचे सामान चढण्या-उतरण्यावेळी झटपट विमानाची तपासणी, देखभाल करण्याची जबाबदारीही त्याला पार पाडावी लागते. शिवाय कोणताही दृष्टिदोष असू नये.

कोर्स

बीई/बीटेक (एयरोनॉटिकल इंजिनीअर) किंवा कमीत कमी एयरोनॉटिक्स विषयात डिप्लोमा असावा. विविध महाविद्यालये किंवा आयआयटीतर्फे एयरोनॉटिक्स या विषयात पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएट करावे लागते. बऱ्याच पॉलिटेक्स संस्थांमध्ये एविएशनमध्ये डिप्लोमा कोर्स करता येतो. बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री, आणि गणित या विषयात उत्तम गुणांनी पास होणारे विद्यार्थी बीई/बीटेकसाठी प्रवेश घेऊ शकतात. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आयआयटी-जेईई परीक्षा पास होणे आवश्यक आहे. कोर्सचा अवधी चार वर्षांचा असतो. डिप्लोमा कोर्स दोन-तीन वर्षांचा असतो.

आपली प्रतिक्रिया द्या