फायटरने ठोसा मारून तीन दात पाडले; चारजणांविरुध्द गुन्हा दाखल

लातूर शहरातील दुर्गादेवी चौकात भांडण काढून शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच फायटरने ठोसा मारून तीन दात पाडल्याप्रकरणी चारजणांविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणप्रकरणी यासीम समदानी पठाण याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 27 तारखेला रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण करून फिरण्यासाठी म्हणून दुर्गा देवी चौकात आला असता जाऊल हमीदखन पठाण, जुबेर हमीदखन पठाण, मारुफ हमीदखान पठाण व जमीला इसाक फकीर यांनी तक्रारदाराशी भांडण काढून शिवीगाळ केली. लाथाबुक्क्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. जाऊल हमीदखॉ पठाण याने हातातील फायटरने तोंडावर मारून तक्रारदाराचे तीन दात पाडले.