‘The Kerala Story’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तुफान गल्ला जमवला आहे. देश, विदेशात या चित्रपटाने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तिकीटबारीवर तुफान चाललेल्या हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला असून काही राज्यांमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीही घालण्यात आली. दरम्यान, या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) यांना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागल्याने त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत.

सुदीप्तो सेन हे चित्रपटाच्या पोस्ट प्रमोशनच्या निमित्ताने विविध ठिकाणचे दौरे करत आहेत. सततच्या प्रवासामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेन यांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चित्रपटाचे प्रमोशनही थांबवण्यात आले असून त्यांचे आगामी दौरेही रद्द करण्यात आले आहे. तब्येत बरी झाल्यानंतर ते पुन्हा एकदा प्रमोशन सुरू करणार असून त्यासाठी ते 10 शहरांना भेट देण्याची त्यांची योजना आहे.

‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला. अदा शर्मा, योगिता बिहाणी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांची यात प्रमुख भूमिका आहे. विपुल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये केरळमधील चार महिलांची कथा सांगितली आहे. फसवणूक करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास आणि इसीसीमध्ये सहभागी होण्यासाठी कसे भाग पाडले जाते याचे चित्रण यात दाखवण्यात आले आहे.

मात्र या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. तामिळनाडूमध्ये, पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पश्चिम बंगालमधील चित्रपटावरील बंदी हटवण्यात आली आहे. हा चित्रपट आता पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित होत आहे.

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी, जबरदस्तीने धर्मांतर केलेल्या 7000 मुलींची घेतली होती भेट

दरम्यान, या चित्रपटाने आत्तापर्यंत हिंदुस्थानात 216.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 250 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले असले तरी आजही अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. या महिलांची संख्या लक्षणीय आहे.

‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेनचा अपघात