बाजारात आली इलेक्टिक सायकल; 100 किमी चालते, घरच्या घरी चार्ज होते!

प्रदूषण टाळणारे वाहन म्हणजे सायकल. शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रदूषण टाळण्याकरिता नेक्सझू मोबिलिटी या कंपनीने रोडलार्क नावाची इलेक्ट्रिकवर चालणारी सायकल बाजारात आणली आहे. या सायकलचे अनेक फायदे या कंपनीने सांगितले आहेत.

दिवसाला 100 किलोमीटरचे अंतर पार करणारी ही सायकल नेक्सझू मोबिलिटी या बेंगळुरूमधील विद्युत वाहने तयार करणाऱ्या कंपनीने ही रोडलार्क नावाची सायकल तयार केली आहे. हिंदुस्थानी बाजारात या सायकलची किंमत 42,000 रुपये आहे. या सायकलचे वैशिष्ट्य म्हणजे घरी ग्राहकांना ती घरी सहजरित्या चार्जही करता येऊ शकते. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटर अंतरापर्यंत ती चालवता येऊ शकते.

बॅटरी संपल्यावर ही सायकल पेडलच्या साहाय्याने चालवता येऊ शकते. त्यामुळे ही टू इन वन आहे. तसेच यामध्ये ड्युअल बॅटरी सिस्टम असून यामध्ये 8.7Ah ची हलकी आणि रिमूव्हेबल बॅटरी लावण्यात आली आहे.

दर तासाला 25 किलोमीटर वेगाने ही सायकल सायकलस्वाराला चालवता येऊ शकते. या सायकलला असलेल्या ड्युअरल वेंटिलेटेड डिस्क ब्रेक आहेत. याच्या मदतीने ती नियंत्रणात आणता येऊ शकते. त्यामुळे खडकाळ रस्त्यावरही ती उत्तमरित्या चालवता येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या