निलंगा तालुक्यातील हलगरा येथे जमिनीतून गूढ आवाज

1389

निलंगा तालुक्यातील मौजे हलगरा शिवारात भुजल सर्वेक्षण विभागाने पाडलेल्या विंधन विहिरीमधून गूढ आवाज येत असल्याने शेतकरी घाबरुन गेले आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निलंगा तालुक्यातील हलगरा शिवारातील जमिनीमध्ये गतवर्षी भूजल सर्वेक्षणाच्या केंद्रीय पथकाने विंधन विहीरी खोदकाम माध्यमातून तेल साठे शोधण्याच्या माध्यमातून हलगरा परिसरात जवळपास पंचवीस विंधन विहीरी घेऊन तपासणी केलेली होती. मातीचे नमुने पाठवण्यात आले होते व नंतर ते खड्डे बुजवण्यात आले होते पण त्यापैकी एक खड्डा जमिन सर्वे नंबर १५१ हिराचंद जैन यांच्या पेरणी केलेल्या जमिनीमध्ये अचानक १० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते तीन वाजता ३ फूट रुंद व १० फूट खोल असा एक खड्डा तयार झाल्यामुळे व त्यामधून वेगवेगळे आवाज व हवा येत असल्याने शेतकरी भयभीत झाले. त्यांनी निलंगा तहसीलदार यांच्याकडे पाहणी करून आवाजाची चौकशी करण्याच्या मागणीचा अर्ज दिलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या