प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या गुडसूर येथील कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

सामना प्रतिनिधी । गुडसूर

गुडसूर येथील डोंगरशेळकी ते मंगरुळ हा चौदा किलो मीटरचा रस्त्याच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. सदरील रस्त्याचे काम म्हणजे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जाते आहे.

सन २०१३/१४ मध्ये डोंगरशेळकी ते मंगरुळ हा चौदा किलो मीटरचा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुर करून या डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केला गेला. पण संबंधित काम हे वेळेत न झाले नाही. आता परत या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आले आहे. हे काम म्हणजे अधिकारी व कंत्राटदार यांची मनमानी असल्याचे दिसत आहे. कारण कामाची क्वालिटी तर नाहीच पण हिप्परगा पाटी येथे पुलासाठी टाकण्यात आलेले पाईप व इतर साहित्य अचानकपणे गायब झाल्यामुळे ग्रामस्थांमधून उलट सुलट चर्चा रंगू लागली. या बाबतीत अधिकाऱ्यांशी मोबाईल वरुन संपर्क साधला व येथील पुलाचे काम कशामुळे बंद आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की संबंधित पुल रद्द करण्यात आला असून तेथे पुलाची आवश्यकता नसल्याचे सांगितले. मग आवश्यकता नव्हती तर तेथे पुल मंजूरच कसा झाला? अशा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधित पुलाच्या कामाची चौकशी करावी व होत असलेल्या कामाची चौकशी करून दोषी व्यक्तीवर कार्यवाही करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.