सूप वाजले, पुढील अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून मुंबईत

34

सामना ऑनलाईन । नागपूर

राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. पुढील अधिवेशन मुंबईत २६ फेब्रुवारीपासून सुरू होईल. पुढील वर्षी हिवाळीऐवजी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा प्रस्ताव असून याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली.

शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी घेतलेली आक्रमक भूमिका, विधान भवनावर काढलेला हल्लाबोल मोर्चा यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात फारसे कामकाज झाले नव्हते. परंतु दुसऱया आठवडय़ात मात्र रोज दहा ते बारा तास कामकाज करून ही कसर भरून काढण्यात आली. दहा दिवसांत जवळपास रोज सरासरी सात तास याप्रमाणे ७० तास कामकाज झाले. अधिवेशनात ११ विधेयके मंजूर करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या