वेब सिरीजच्या नावाखाली सुरू होते सेक्स रॅकेट

वेब सिरिजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा क्राईम ब्रँचच्या समाजसेवा शाखेने पर्दाफाश केला. सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक करून तीन तरुणींची सुटका केली. सुटका केलेल्या तरुणींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. वेब सीरिजमध्ये काम देण्याच्या नावाखाली एक महिला सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्या माहितीची शहानिशा करून पोलिसांनी अंधेरी परिसरात सापळा रचला. मंगळवारी रात्री ही महिला तीन तरुणींना घेऊन त्या हॉटेलजवळ आली. त्यानंतर समाजसेवा शाखेच्या पथकाने त्या महिलेला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन मॉडेल आणि एका तरुणीची सुटका केली. ज्या दोन मॉडेलना वेब सीरिजमध्ये काम देण्याच्या नावाखाली तेथे बोलावले होते, त्या दोन मॉडेलनी यापूर्वी काही वेब सीरिजमध्ये काम केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या