शाळेत ज्या विद्यार्थिनीला शिकवलं, मोठी होताच तिच्याशीच केलं लग्न!

ब्रिटनमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. एका शिक्षकाने त्याच्याहून 34 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीशी लग्न केलं आहे.  हा शिक्षक तिला प्राथमिक वर्गात शिकवण्यासाठी होता.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षकाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्या विद्यार्थिनीच्या व शिक्षकाच्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधाबद्दल तिच्या कुटुंबीयांना काहीही थांगपत्ता नसल्याचंही उघड झालं आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, शिक्षकावर आरोप आहे की, जेव्हा ही विद्यार्थिनी 11 वर्षांची होती तेव्हाच त्याने तिला प्रेमसंबंधाबद्दल गळ घालण्यास सुरुवात केली होती आणि जेव्हा ती 18 वर्षांची झाली तेव्हा शिक्षकाने तिच्याशी लग्न केले.

या शिक्षकाचा याआधीही एक विवाह झाला आहे. मात्र, त्याला त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते.

ब्रिटनच्या शिक्षक न्यायाधिकरणात शिक्षकाचा विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह संबंध असल्याच्या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, त्या मुलीला अतिरिक्त शिकवणीच्या आधाराची आवश्यकता असल्याचे कारण देत विद्यार्थिनी वर्गानंतर शिक्षकासोबत राहत होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना याबाबत कधीच संशय आला नाही. तिच्या कुटुंबाला गेल्या 7 वर्षांपासून या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. जेव्हा पोलीस चौकशीसाठी मुलीच्या घरी गेले तेव्हा त्यांना मुलीच्या नात्याबद्दल कळले.

तो शिक्षक त्या विद्यार्थिनीला दागिने आणि पैसे देत असल्याचेही समोर आले आहे. तसंच या विद्यार्थिनीवर तिच्या शालेय शिक्षणाच्या काळात त्याने अत्याचार केल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं निरीक्षण ब्रिटीश ट्रिब्यूनलने सुनावणी दरम्यान नोंदवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या