दल सरोवर इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येणार

651

श्रीनगरमधील प्रसिद्ध दल सरोवर आणि आजूबाजूचा परिसराचा समावेश इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये करण्यात येणार आहे. प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे आक्रसत चाललेले सरोवर वाचवण्यासाठी जम्मू-कश्मीर सरकारने हा निर्णय घेतला असून त्यासाठी 10 सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे 22 चौरस किलोमीटरचे हे सरोवर आता केवळ 10 चौरस किलोमीटर उरले आहे. सरोवराचा आकार 40 टक्क्यांनी कमी झाला असून पाण्याचा दर्जाही खराब झाला आहे. ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबतचा अहवाल 2017 मध्ये दिला होता. दरम्यान, एका महिन्यात याबाबतचा मसुदा तयार करून सरकारला सादर केला जाणार आहे. समितीला लागणाऱ्या सर्व सुविधा गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून पुरवण्यात येणार आहेत

आपली प्रतिक्रिया द्या