दूधवाल्यासोबत पत्नीचं प्रेम कळल्यावर नवऱ्यानेही घेतला गैरफायदा, पत्नीने केली त्याची हत्या

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची अतिशय धक्कादायक घटना उत्तराखंड येथील हरिद्वार येथे घडली आहे. पत्नीच्या प्रेम प्रकरणात पती सतत बाधा आणत असल्यामुळे हे कृत्य केल्याचे त्या दोघांनी पोलिसांना सांगितले आहे.

हरिद्वार येथील देहात पथरी ठाणा परिसरात 11 मे रोजी अंजना नावाच्या एका महिलेने तिचा नवरा संजीव हरवल्याची तक्रार पोलिसात केली. तिने केलेल्या तक्रारीनुसार पोलीस शोध घेत असताना पोलिसांना अंजनाचाच संशय आला म्हणून त्यांनी तिचीच कसून चौकशी केली.

या चौकशीदरम्यान अंजनाने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ती राहात असलेल्या जवळच्याच गावातील शिवकुमार नावाच्या दूधवाल्यासोबत तिची मैत्री होती. कालांतराने या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ही गोष्ट अंजनाचा नवरा संजीवला कळल्यावर तो या दोघांना ब्लॅकमेल करत असे. तसेच त्यांना गावात तुम्हा दोघांचे प्रेमप्रकरण सांगून अपमान करण्याची धमकी वारंवार देत असे. सतत त्याच्यासमोरच शारीरिक संबंध ठेवायला सांगत असे. स्वत:ही तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक संबंधांकरिता दबाव आणत असे. संजीवच्या या त्रासाला अंजना फारच कंटाळली होती. तसेच तो शिवकुमारच्या आणि तिच्या प्रेमात अडचणी आणत होता.

म्हणून एक दिवस शिवकुमार आणि अंजनाने संजीवचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार एक दिवस संजीवला शारीरिक संबंधांचे अमिष दाखवून संजनाने घरी बोलावले. संजीव घरी आल्यावर शिवकुमार आणि संजनाने त्याचा दोरीने गळा आवळला आणि त्याचा खून केला. त्यानंतर संजीवचे मृत शरीर एका पोत्यात भरून जंगलात नेऊन जाळले.

या प्रकरणी पोलीस अधिकारी प्रमेंद्र डोभाल यांनी सांगितले की, संजीवचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी रविवारी जंगलातून ताब्यात घेतला. अंजना आणि तिचा प्रियकर शिवकुमार याला पोलिसांनी संजिवची हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या