साईभक्त बी. विजयकुमार व सी. वनजा हैदराबाद यांच्या देणगीतून साईबाबा समाधी मंदिराच्या कळसाच्या आतील बाजुस सुवर्ण वज्रलेपाचे ( मुलामा ) काम पुर्ण झाले आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी विजयकुमार यांचा श्री साईबाबांची मुर्ती व विभुती देऊन सत्कार केला.
देणगीदार साईभक्त बी. विजयकुमार यांनी 2007 मध्ये समाधी मंदीरावरील कळस व त्याभोवताली असलेले चार गोपुर यांना सुवर्ण मुलामा देण्याचे काम देणगीस्वरुपात केले आहे. यावर आता पुन्हा एक थर सुवर्ण वज्रलेप करण्याचे कामही करण्यात आले आहे. यापुर्वी 2006 मध्ये श्रींच्या समाधी मंदीरातील सोन्याच्या पादुका, सोन्याची झारी व फुलपात्र, 2008 मध्ये सोन्याची चिलीम, 2010 मध्ये गुरुस्थान मंदिराच्या बाहेरील बाजुस सुवर्ण मुलामा, 2015 मध्ये श्री शनि मंदिर, श्री गणपती मंदिर व श्री महादेव मंदिर या तिन्ही मंदिराच्या कळसांना सुवर्ण मुलामा देण्याचे काम देणगीदार बी. विजय कुमार यांचे देणगीतून केले आहे. तसेच मार्च 2023 मध्ये श्री साईबाबांचे चावडीतील दोन चांदीचे सिंहासन, नंदादीप, श्री व्दारकामाईचे चांदीचे सिंहासन व समाधी मंदीरातील शोरुमचे सिंहासन यांना देखील सुवर्ण मुलामा देण्याचे काम देणगीदार साईभक्त बी. विजय कुमार यांचे देणगीतून झाले आहे. देणगीदार साईभक्तांच्या विनंतीवरुन देणगी मुल्य नमुद केलेले नाही.