
अक्कलकोट तालुक्यातील कंटेहल्ली येथील पाणीपुरवठा योजनेत ई-निविदामध्ये कायदा डावलून कार्यारंभ आदेश दिल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मुख्य लेखाधिकारी दीपक कोळी आणि प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील मौजे कंटेहल्ली येथील पाणीपुरवठा योजनेत ई-निविदामध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेचा धनादेश ठेकेदार पवार यांनी मुदत संपल्यावर भरला असून, तत्कालीन कार्यकारी अभियंता कोळी यांनी मुदत संपल्यावर कायदा डावलून धनादेश भरून घेतला आहे. ठेकेदार पवार यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय असतानाही त्यांना अपात्र ठरवले नाही. तसेच त्यांना काळय़ा यादीत टाकून सोलापूर जिल्हा परिषदेकडील ई-निविदा प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभाग घेता येणार नसल्याची कारवाई करण्याची आवश्यकता असतानाही दीपक कोळी यांनी कायदा डावलून कारवाई केली नाही. सन 2022-23 या वर्षात ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाकडून ठेकेदार पवार यांनी फक्त सहा महिन्यांत दोन कोटी 17 लाख रुपयांचे काम घेतले आहे. पण, चालू आर्थिक वर्षात एकही काम घेतले नाही, असे खोटे हमीपत्र पाचशे रुपये बॉण्डपेपरवर खोटी माहिती सादर करून निविदा शर्ती व अटीचा भंग केला आहे. यामुळे त्यांना अपात्र करणे बंधनकारक असतानाही अपात्र केले नाही. दीपक कोळी यांनी कायदा डावलून कर्तव्यात कसूर करून अनियमितता दाखवून नियमबाह्य कार्यारंभ आदेश दिले आहेत.
237 या शासन निर्णयामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना चालू आर्थिक वर्षात 3 कोटी रुपयांपर्यंतची कामे घेण्याची मर्यादा असेल, तर ई-निविदा लिफाफामध्ये प्रतिवर्षी दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त कामे घेतली नसल्याचे हमीपत्र कसे घेतले. तसेच सदर हमीपत्र ई-निविदा लिफाफामध्ये स्कॅन करून जोडणे बंधनकारक आहे. याबाबत गेल्या तीन महिन्यांपूर्वी कायदा डावलून दिलेले चुकीचे कार्यारंभ आदेश रद्द करण्याची मागणी बसवराज बिराजदार यांनी अनेकवेळा लेखी अर्जाद्वारे केली होती. मात्र, प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी कायदा डावलून चुकीच्या नियमबाह्य कामास पाठीशी घालत होते. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी कटकधोंड यांना समक्ष बोलावून जाब विचारला. याकेळी नोटीस बजावून दोन दिवसांत सदर नियमबाह्य काम थांबवतो, असे सांगितले होते. मात्र, महिना उलटून गेला तरी कटकधोंड यांनी कारवाई केलेली नाही. यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी कंटेहल्ली येथील नियमबाह्य कामाचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.