नाटकांचे ऑलिम्पिक यंदा मुंबईत

20

सामना ऑनलाईन, मुंबई

चित्रपटांच्या भाऊगर्दीतही लोककला, लोकनृत्य व संस्कृतीचा वसा जपत पारंपरिक आणि आधुनिक नाटकांचा मेळ असलेल्या जागतिक नाटकांचा आविष्कार मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे आणि तोसुद्धा मोफत! २४ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत रंगणाऱया आठव्या जागतिक थिएटर ऑलिम्पिकमध्ये जगभरातील नाटकांचा आस्वाद विनामूल्य घेता येणार आहे. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी)तर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवादरम्यान नाटकांकडे प्रेक्षकांचा कमी होत असलेला ओढा या विषयावर  परिसंवादही होणार आहे. नेहरू सेंटर संध्या ७.३० तर रवींद्रमध्ये ४.३० वाजता प्रयोग होतील.

थिएटर ऑलिम्पिक

ग्रीसमध्ये डेल्फी येथे १९९३ मध्ये ‘द थिएटर ऑलिम्पिक’ची सुरुवात झाली. यात जगभरातील नाटय़कर्मी सहभागी होतात. नाटय़ संस्कृतीचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण या माध्यमातून होते.

‘थिएटर ऑलिम्पिक भारतात आणण्यासाठी गेले तीन वर्षे आम्ही प्रयत्न करत होतो. ते स्वप> पूर्ण झाले आहे. भारतीय रंगभूमीला जागतिक नकाशावर ठेवण्याच्या प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.’  -वामन केंद्रे, संचालक,नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा

काय पाहाल? 

जगभरातील एकूण २८ नाटके पाहायला मिळणार आहेत. यात ८ विशेष आमंत्रित नाटकांचा समावेश आहे. यात ‘मोहे पिया’ (वामन केंद्रे), सोनाटा (सोहाग सेन), रश्मकिरथी (रविशंकर खरे), फेरा (सौमित्र चॅटर्जी) या भारतीय तर श्री ४२० (सबा झैदी आणि अतुल तिवारी, ऑस्ट्रेलिया), ऑलमोस्ट अलाइव्ह (सबिन मोलेनार, बेल्जियम) आणि झुन झँग्ज प्रिग्रमिज (वँग झिआंग्युन, चीन) या परदेशी नाटकांचा समावेश आहे.

थिएटर ऑलिम्पिकतर्फे सध्या देशभरातील १७ शहरांमध्ये नाटकांचे ४५० प्रयोग सुरू आहेत. त्यात ६०० अम्बियन्स परफॉमर्न्स आणि २५० यूथ शोचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या