लातूरात बंद घर फोडून 4 लाख 4 हजाराचा ऐवज लांबवला

लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आदर्श कॉलनीमधील बंद घर चोरट्यांनी फोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 4 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सूर्यभान उर्फ बाबूराव गणपतराव पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी दुपारी 3 ते सायंकाळी 6.45 या वेळेत घराचे कुलूप तोडून घरातील रोख 1 लाख 55 हजार रुपये, 8 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत सुमारे 2 लाख 49 हजार रुपये) असा ऐवज चोरुन नेला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लाकाळ करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या