ऍक्टिव्हाच्या डिक्कीतून पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

399
gold

नाशिकरोडच्या दत्तमंदिर परिसरात ऍक्टिव्हाच्या डिक्कीतून चोरटय़ांनी भरदिवसा पावणेतीन लाखांचे दागिने चोरले. अंबड लिंक रस्त्यावरील जाधव संकुल येथील शाहरूख सलमान पठाण हे शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ऍक्टिव्हावरून आई व बहिणीसोबत नाशिकरोडच्या दत्तमंदिर येथील बँक ऑफ इंडियामध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ते तासाभरात परतले असता ऍक्टिव्हाच्या डिक्कीत ठेवलेली कापडी पिशवी चोरटय़ांनी पळविल्याचे लक्षात आले. त्यात नऊ तोळे वजनाचे, 2 लाख 82 हजार 900 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे

आपली प्रतिक्रिया द्या