बघायला गेले बाहुबली, चोरांनी घर केले खाली!

65

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिकमध्ये एका कुटुंबाला ‘बाहुबली-२’ चित्रपट पाहणं चांगलंच महाग पडलं आहे. चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या ससाणे कुटुंबियाच्या घरी चोरांनी डल्ला मारला. ससाणे यांच्या घरातून चोरांनी ८ तोळे सोनं आणि ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. नाशिकमडील हिंदवाडी परिसरात भर दुपारच्या वेळी ही घटना घडली.

ससाणे कुटुंब दुपारी ३ वाजता बाहुबली-२ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात घुसखोरी केली. सोनं आणि रोख रकमेवर हात साफ करुन चोरट्यांनी पोबारा केला. घरी आल्यावर ससाणे कुटुंबाला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या