Oscar पुरस्कारांच्या मतदानासाठी ‘कांतारा’ पात्र, कश्मीर फाईल्सचाही यादीत समावेश

ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकन प्रक्रियेत पोहोचण्यासाठी जगभरातील 300 चित्रपट मतदानासाठी निवडण्यात आले आहेत. या चित्रपटांच्या यादीत कन्नड चित्रपट कांताराचाही समावेश आहे. या चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक रिषाब शेट्टी याने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.