जवान शहीद होतायंत तरी पाकिस्तानसोबत युद्ध नको, मुख्यमंत्र्यांचा चर्चेचा सूर

29

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील शनिवारी सकाळी सुंजवानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्येही चकमक सुरू असून एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जवानांसह स्थानिक नागरिकांचाही मृत्यू होत आहे. जम्मू-कश्मीमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून खुनी खेळ सुरू असतानाही मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानसोबत युद्ध नको तर चर्चा करायला हवी असा सूर घेतल्यानं त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.

लष्कराच्या बाजुनं ‘मेजर’ निर्णय; मेहबुबा सरकारला न्यायालयाची चपराक

श्रीनगरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरू असताना मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. ‘जम्मू-कश्मीरमध्ये सुरू असलेला रक्तपात थांबवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याची आवश्यकता आहे. मी हे ट्वीट केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मला देशद्रोही असं संबोधले जाणार आहे मात्र मला यामुळे काहीही फरक पडत नाही’, असे मेहबुबा यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. तसेच दहशतवाद्यांपासून जम्मू-कश्मीरच्या नागरिकांनाही त्रास होत आहे. मात्र यावर युद्ध नाही तर चर्चा हाच पर्याय आहे, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मेहबुबा यांनी याआधीही कश्मीरप्रश्नी पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचा सूर आवळला होता.

याआधी जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुला यांनी पाकिस्तानचे नाव न घेता टीकेचा आसूड ओढला होता. ‘जितका दहशतवाद वाढेल तितका धोका वाढत जाईल आणि त्याच्या (पाकिस्तान) देशावर याचा वाईट परिणाम होईल’, असे अब्दुल्ला म्हणाले होते. एकदिवस दहशतवादीच त्यांना पोखरून टाकतील आणि त्या देशात काहीही शिल्लक राहणार नाही. तसेच दहशतवाद वाढल्यास याबाबत हिंदुस्थानलाही उपाय योजना कराव्या लागतील’, असं म्हटलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या