या सात राशींच्या व्यक्ती असतात भाग्यवान

281

सामना ऑनलाईन। मुंबई

बऱ्याचवेळा आपल्यापैकी अनेकजण खूप कष्ट करतात पण त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही. तर काहीजण असेही असतात ज्यांना कमी कष्ट करूनही पटकन् यश मिळतं. जाणून घेऊ या अशा ७ भाग्यवान राशींबदद्ल.

मेष….रोखठोक स्वभाव असला तरी नशिबाची यांना चांगली साथ असते. प्रामाणिकपणाच्या जोरावर या राशी अशक्य गोष्टीही शक्य करुन दाखवतात. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची रासही मेष आहे.

ajay-devgan-3

वृषभ…या राशींच्या व्यक्तींवर गुरूची कृपा असते. यामुळे सर्वच कार्यक्षेत्रात यांची प्रगती होते. कामाच्या ठिकाणी सर्वांशी यांची मैत्रीपूर्ण संबंध असते.यामुळे यांना अडचणीत मदत करण्यासाठी अनेक हात तयार असतात. अनुष्का शर्माची रास वृषभ आहे.

anushka-sharma

कर्क...या राशीच्या व्यक्ती भाग्यवान असतात. या व्यक्ती जितकं भावनिक आवाहन करतात. तेवढी त्यांची प्रगती होते. देसी गर्ल प्रियांका चोप्रा कर्क असून यश मिळवत आहे.

priyanka-chopra

सिंह...बुध्दीमान व आक्रमक स्वभावामुळे सिंह राशींच्या व्यक्तींची वेगळी ओळख असते. आपल्या या दोन गुणांवर ते अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवतात. जॅकलीन फर्नांडीसची रास सिंह आहे.

jaclin-fernandes

तूळ…या राशींच्या व्यक्तींचे भाग्य त्यांना नेहमी धक्का देत असते. काही कळण्याच्या आतच त्यांच नशीब झटक्यात बदलतं.  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची रास तूळ असून य़श नेहमीच त्यांच्या सोबत असते.

amitabh-b

धनु…धनु राशीचे लोक सर्वाधिक भाग्यवान असतात. यांच्या राशीचा भाग्य ग्रह गुरू आहे. अशक्य गोष्टीही यांना शक्य होतात. टॉलिवूड ,सुपरस्टार रजनीकांत धनु राशीचे असून आजही ते काम करत आहेत.

rajnikanta

मीन...या राशीचा स्वामी गुरू आहे. यांच्यात इतरांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा गुण असतो. तसेच नाविन्याचा ध्यास यांना शांत बसू देत नाही. यामुळे एकाहून अनेक गोष्टीत या व्यक्ती पारंगत असतात…आमिर खान मीन राशीचा असून सतत नवीन विषयाच्या शोधात असतो.

aamir-khan-2

आपली प्रतिक्रिया द्या