‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 200km मिळेल रेंज

हिंदुस्थानात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही मागणी लक्षात घेऊन अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या कारचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच देशात इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्यांसाठी इलेक्ट्रिक कार हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बद्दलची माहिती या बातमीद्वारे सांगणार आहोत. चला तयार जाणून घेऊ…

टाटा टिआगो (Tata Tiago)

टाटा टिआगो ही सध्या देशात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. याची प्रारंभिक किंमत 12 लाख रुपयांपासून सुरू होते. ही इलेक्ट्रिक कार Ziptron टेक्नॉलॉजीने संचालित होते. कंपनीने यात 55KW ची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. तसेच यात 26kWh ची लिथियम बॅटरी देण्यात आली आहे.

टाटा नेक्सन इलेक्ट्रिक (Tata Nexon)

टाटा नेक्सन सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून ही कार सर्वाधिक रेंज देते, असा दावा कंपनीने केली आहे. एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर ही कार 180 ते 200 किमीचा पल्ला गाठू शकते. या कारची खास गोष्ट म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत ही सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार आहे. ही कार हिंदुस्थानात तीन प्रकारात उपलब्ध आहे. चार्जिंग बद्दल बोलायचे झाले तर ही कार 60 मिनिटात 0 ते 80 टक्के चार्ज होते. या कारची प्रारंभिक किंमत 13.99 लाखांपासून सुरू होते.