या देशांमध्ये आहेत असे विचित्र कायदे…

48

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रशासन नीट चालण्यासाठी कायदा गरजेचा असतो. कायद्यांचं पालन करूनच प्रशासनाचं नियमन करता येतं. पण, जर कायदेच विचित्र असतील तर.. ? जगात असेही काही देश आहेत जिथे काही अफलातून कायदे आहेत आणि त्यांचं पालन न केल्यास तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. जाणून घेऊया अशाच काही कायद्यांविषयी-

१. ऑस्ट्रेलिया- ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया शहरात तुम्ही तुमच्या घरातील बल्ब स्वतःच बदलू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनलाच बोलवावं लागतं. स्वतःच्या घरचा बल्ब स्वतःच बदलल्यास १० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंड होऊ शकतो.

bulb-changing
२. अमेरिका- अमेरिकेतील ओकलाहोमा या प्रदेशात जर तुम्ही एखाद्या कुत्र्याला चिडवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अटक होऊ शकते.

barking-dog
३. जॉर्जिया- जॉर्जिया येथील क्विटमॅन शहरात जर तुमच्याकडे कोंबडा किंवा कोंबडी असेल, तर त्यांपैकी कोणीही एकट्याने रस्ता पार करणं गुन्हा आहे. त्यामुळे कोंबड्यांना चरायला सोडताना मालकाला विशेष काळजी घ्यावी लागते.

chicken-crossing-the-road

४. दक्षिण कॅरोलिनामध्ये रविवारी न्यायालयाबाहेर महिलांना मारहाण करणं बेकायदेशीर आहे.

sc-south-carolina
५. सिंगापूर- सिंगापूरमध्ये च्युइंगम खाणं हा गुन्हा आहे. तुम्ही मिंटचा वापर करू शकता, पण च्युइंगम खाऊ शकत नाहीत.

chewing-gum
६. सॅमोओ या देशात बायकोचा वाढदिवस विसरणं हा गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला जेल होऊ शकते.

a-man
७. इटली- इटलीतील व्हेनिस या शहरात मार्क स्क्वेअर या ठिकाणी चिमण्यांना खाऊ घालणं हा गुन्हा आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास ७०० डॉलर्स इतका जबर दंड भरावा लागतो.mark-square

आपली प्रतिक्रिया द्या