Photo – खेळासोबत रियल लाईफमध्येही पार्टनर आहेत ‘हे’ खेळाडू

जगभरात सध्या ऑलिम्पिकची धूम आहे. या स्पर्धेत असे अनेक खेळाडू खेळत आहेत जे मैदानात आणि मैदानाबाहेरही पार्टनर आहेत. यातील काहींनी लग्न केलेले आहे, तर काही एंगेज्ड अन् काही एकमेकांना डेट करत आहेत. आज आपण अशाच काही जोड्यांबाबत जाणून घेऊ.

1. अतनू दास आणि दीपिका कुमारी

deepika-kumari-atanu-das

दीपिका कुमारी आणि अतनू दास या दोघांनी टोकियो ऑलिम्पिक हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. या दोघांनी 2020 मध्ये लग्न केले आहे.

2. लारा आणि जेसन केनी

laura-and-jason-kenny

लारा आणि जेसन हे दोघेही ब्रिटनचे सायकलिस्ट आहेत. या दोघांनी आतापर्यंत 10 गोल्ड मेडल आपल्या नावे केलेले आहेत.

3. सँडी मॉरिस आणि टायरोन स्मिथ

sandy-morris-and-tyron-smit

अमेरिकेची महिला ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू सँडी मॉरिस आणि बरमुडाचा लॉन्ग जंप अॅथलेट टायरोन स्मिथ यांनी 2019 मध्ये लग्न केले. दोघेही यंदा टोकियो ऑलिम्पिक खेळत आहेत.

4. शार्लोट कॅसलिक आणि ल्युईस हॉलंड

charlotte-caslick-lucy-holl

शार्लोट कॅसलिक ही ऑस्ट्रेलियाच्या महिला रब्बी संघाचे प्रतिनिधित्व करते, तर ल्युईस हॉलंड पुरुष रब्बी संघाकडून खेळतो. दोघेही एंगेज्ड असून कोरोनामुळे त्यांचे लग्न लांबणीवर पडले आहे.

5. गॅरेक मेनहार्ड आणि ली किफर

lee-kiefer

गॅरेक मेनहार्ड हा अमेरिकेच्या पुरुष फेंसिंग (fencing) संघाकडून खेळतो, तर ली किफर महिला संघाकडून खेळते. दोघेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोबत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या