‘हे’ मेडिकल गॅझेट्स बनतील तुमचे फॅमिली डॉक्टर, आजारांवर मिळवू शकाल नियंत्रण

कोरोनामुळे घरातून बाहेर पडू शकलो नाही तरी घरच्याघरी मेडिकल गॅझेट्सच्या माध्यमातून आपली काळजी घेता येते. त्यामुळे ताप, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी, पल्स रेट आणि इतर बर्‍याच गोष्टींचा मागोवा डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिकल गॅझेट्सच्या माध्यमातून घेऊ शकतो.

थर्मामिटर

सगळ्यात महत्वाचे आणि परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असलेले थर्मामिटर घरात असणे अत्यंत आवश्यक आहे. ताप आल्यास थर्मामिटरच्या मदतीने तो मोजता येतो. ताप किती आहे तसे उपचार घेता येतात. जास्त ताप असल्यास ऑनलाइनच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. त्यामुळे थर्मामिटर घरी असलेले केव्हाही चांगले आहे.

हार्ट रेट मॉनिटर

हार्ट हेल्थ ट्रॅकर हेही महत्वाचे गॅझेट आहे. या पोर्टेबल पर्सनल मॉनिटरच्या माध्यमातुन नियमित ईसीजी रेकॉर्ड करू शकता. हे आपल्या हृदयाच्या आरोग्याबाबत अचूक माहिती देतं. हद्यासंबंधी काही तक्रारींचे हे सूचना देते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पोर्टेबल पर्सनल इसीजी मॉनिटर घेऊ शकता.

रक्तदाब मॉनिटर

अलिकडे रक्तदाबाचा अनेकांचा त्रास होत असतो. अशावेळी कोरोना काळात दवाखान्यात दरवेळी शक्य होत नाही. अशावेळी रक्तदाब तपासण्यासाठी इलेक्ट्रॉनिक रक्तदाब मॉनिटर असणे आवश्यक आहे. मात्र घरात कोणाला रक्तदाबाचा त्रास असेल तर घरात असलेले बरे. डॉक्टरांच्या खरेदी केल्यास नेमके कोणते डिव्हाइस चांगले आहे याची माहिती मिळेल.

ऑक्सीमीटर

आजच्या घडीला सगळ्यात महत्वाचे असे उपकरण आहे. ताप आला असल्यास वारंवार ऑक्सिजनची पातळी तपासावी. शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी तसेच रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह या यंत्राने मोजता येताे. हे उपकरण परवडणाऱ्या दरात मिळतं. यासाठी फक्त बोट ठेवून आपली ऑक्सिजनची पातळी मोजता येणार आहे. खरेदी करण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ग्लूकोमीटर

मधुमेही रुग्णांसाठी ग्लूकोमीटर घरात असणे अत्यंत महत्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी अचूक टिपण्यासाठी ग्लूकोमीटर या यंत्राची मदत होते. याला ग्लूकोज ट्रॅकरही म्हंटले जाते. डॉक्टरांकडून मधुमेहींना ग्लुकोमीटर घरात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. बऱ्याचदा डॉक्टर रुग्णांना ग्लूकोमीटर घरात ठेवण्याचा सल्ला देतात.

पेन रिलीफ

दरदिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीचे काहीनाकाही दुखत असते. अशावेळी पेन रिलीफ डिव्हाइस असणे खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. यात हॉट पॅड्स, मालिश करणारे, मज्जातंतू स्टीमर इत्यादी विविध उपकरणांचा समावेश आहे. आपल्या गरजेनुसार योग्य डिव्हाइस मिळविण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या