डॉक्टरच्या घरातून 47 लाखांचे दागिने चोरीला

36

सामना प्रतिनिधी, मुंबई

महिला डॉक्टरच्या घरातून 47 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडला. चोरीप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार या डॉक्टर असून त्या वांद्रे येथील बँड स्टॅण्ड येथे राहतात. गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे दोघेजण कामाला होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी घरातील कपाट उघडले तेव्हा 47 लाख रुपयांचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी तीनजणांची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात केली तर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. चोरीला गेलेल्या वस्तू हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

बनावट चावीचा वापर केल्याचा संशय
डॉक्टर या दिवसभर दवाखान्यात असतात. त्यांच्याकडे कामाला असलेल्या दोघांनी बनावट चावीचा वापर करून कपाट उघडले असावे असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या