चोरीसाठी घरात घुसलेला चोर दमून-भागून झोपला, पुढे काय झालं वाचा सविस्तर बातमी

2524

चोरीसाठी घरात घुसल्यानंतर घरातीस खाण्यापिण्याच्या गोष्टी संपवून फरार झालेल्या चोरांच्या आपण अनेक बातम्या वाचल्या आहेत. मात्र चोरीसाठी घरात घुसल्यानंतर झोप लागलेल्या चोराची बातमी तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. सदर घटनेत चोरीसाठी घरात घुसलेला हा चोर इतका दमला होता की घरात गेल्यानंतर त्याने सरळ सोफा जवळ केला आणि तो झोपला.

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. अनिल सहानी नावाचा चोर एक मजली घरामध्ये शिरला. अनिलने या कौलारू घराचे कौल काढले आणि तो घरात शिरला. ज्या घरात तो शिरला होता ते घर सुदर्शन यांच्या मालकीचं आहे. उप्पीनगडी इते असलेल्या उल्हास जंक्शनवर त्यांचं हे घर आहे. बुधवारी रात्री अनिल या घरात शिरला. जेव्हा तो घरात शिरला तेव्हा ते फुल्ल दारू प्यायलेला होता. त्याला इतकी छडली होती की त्याने चोरी करण्याऐवजी झोपणं पसंत केलं.

सुदर्शन जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले तेव्हा त्यांना घराची कौलं निघालेली दिसली. त्याने हातामध्ये काठी घेतली आणि घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर त्यांना एक अज्ञात माणूस सोफ्यावर ढाराढूर झोपलेला दिसला. त्याच्या हातामध्ये चाव्यांचा जुडगा देखील होता. हादरलेल्या सुदर्शन यांनी अनिलला काठीने चोपायला सुरुवात केली. अनिल कसाबसा धडपडत उठला. सुदर्शन यांनी शेजारपाजारच्यांच्या मदतीने अनिलला पोलिसांच्या हवाली केला. अनिल हा बिहारच्या माजीपूरचा रहिवासी असल्याचं पोलीस तपासात कळालं आहे.

केरळमध्येही एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. 18 फेब्रुवारीच्या रात्री एक चोर अर्नाकुलम जिल्ह्यातील थिरूवानकुलम भागातील घरात घुसला. चोरी करत असताना त्याला लष्कराची टोपी दिसली. ते पाहिल्यानंतर या चोराला आपण जवानाच्या घरात शिरल्याबद्दल खंत वाटायला लागली. त्याने सगळा ऐवज तिथेच ठिवला आणि भिंतीवर क्षमा मागितली. क्षमा मागत असताना त्याने बायबलमध्ये वाक्ये भिंतीवर लिहली आणि आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. या घराचा सांभाळ करणाऱ्या नोकराला दिसऱ्या दिवशी घरात सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं ज्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा त्यांना सैनिकाच्या घरातील दारू चोराने प्यायल्याचं निदर्शनास आलं

आपली प्रतिक्रिया द्या