कॅमेरामनचे लेन्स, चार्जर चोरणारा गजाआड

144

शिवडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे व्हिडियो चित्रीकरण करणाऱया कॅमेरामनचे महागडे लेन्स, चार्जर व अन्य साहित्य चोरून पसार झालेल्या जलील जलालुद्दीन शेख (19) आणि मो. फरहान मो. युसूफ अली शेख (18) यांचा शिवडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

नियाज मन्सुरी हा कॅमेरामन 15 ऑगस्टनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे शिवडीच्या बीपीसीएल कंपनीच्या मागच्या बाजूला व्हिडियो शूटिंगचे काम करीत होता. त्या वेळी पोलजवळ ठेवलेली त्यांची बॅग गायब असल्याचे निदर्शनास आले. शोधाशोध करूनही बॅग न मिळाल्याने मन्सुरीने शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची लगेच दखल घेत उपनिरीक्षक किरण मांढरे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

आपली प्रतिक्रिया द्या