ते मॅरेथॉन मध्ये धावत होते,चोर गाड्या फोडत होते.

13

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

नवी मुंबईमधील वाशी स्टेशन परिसरात जवळपास १५ गाड्यांच्या काचा फोडून त्यातील सामान चोरल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी नवी मुंबईत वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभाग घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात नागरिक आले होते. यातील अनेकांनी वाशी स्टेशन परिसरात आपल्या गाड्या पार्क केल्या होत्या.

त्यानंतर मॅरेथॉन मध्ये धावून आल्यावर पाहीले तेव्हा आपल्या गाड्यांच्या काचा फोडून आतील सामान घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याचे समोर आले. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभागी झालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या