लातूरात चोरट्यांनी घर फोडले; सोन्याचे दागिने, रोख रक्कम पळवली

लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घर चोरट्यांनी फोडले. रोख रक्कम आणि सोन्याचे, चांदीचे पळवण्यात आले. या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चंद्रशेखर पांडुरंग हालगे वय 46, धंदा. खाजगी नौकरी रा. कन्हेरीवाडी ता. परळी जि. बिड हा. मु. सुर्यप्रकाश रेसीडेन्सी हॉटेल पाठीमागे लातुर येथे ते भाडयाच्या घरात राहत होते.

अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. रूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने 7 ग्रॅम नेकलेस, 12 ग्रॅम कानातील दागिने व 3 ग्रॅमची अंगठी, 3.84 ग्रॅमची नथ, 25.84 ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत 51,500 रुपये, चांदीचे दोन ताट, वाटया, 2 चमचे व 2 करंडे असा एकुण 2000 रुपये व रोख रक्कम 20,000 रुपये असा एकुण 73,500 रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला.