वेळेआधी अकरावीची तिसरी यादीही जाहीर

30

सामना ऑनलाईन । मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादीही वेळेआधीच जाहीर झाली आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणारी गुणवत्ता यादी २४ तास आधीच जाहीर झाली. या यादीत एकूण ४७ हजार ९५६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून यातील ९ हजार ५५४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे.

तिसऱ्या यादीत आर्टस्च्या ३ हजार ५१६, सायन्सच्या १२ हजार २८५, कॉमर्सच्या ३१ हजार ७४५ तर एमसीव्हीसीच्या ४१० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी ३१ जुलै व १ ऑगस्ट या दोन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे.
अकरावीची शेवटची म्हणजेच चौथी गुणवत्ता यादी ५ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. या यादीसाठी आता केवळ ५७ हजार २३० जागा शिल्लक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या