येत्या पावसाळ्यात २६ वेळा समुद्राला मोठी भरती

29

सामना ऑनलाईन । मुंबई

येत्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रात तब्बल २६ वेळा मोठी भरती येणार आहेत. समुद्रात साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. याच दरम्यान अतिवृष्टी झाल्यास मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

चारही बाजूला समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठय़ा भरतीचा धोका असतो. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असला तरी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असतील तर मात्र समुद्र किनाऱयावर न जाण्याचा इशारा पालिकेतर्फे दिला जातो. याच वेळी अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा नैसर्गिक पद्धतीने होत नाही. त्यामुळे सखल भागात पाणी साचते. पालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार येत्या पावसाळ्यात तब्बल २६ वेळा मोठी भरती येणार आहे.

सर्वात मोठी भरती १५ जुलैला
सर्वात मोठी भरती १५ जुलैला दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनी येणार असून या वेळी ४.९७ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. २६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी समुद्रात ४.४८ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या, तर २००९मध्ये सर्वात उंच म्हणजे पाच मीटर उंचीची भरती आली होती. मात्र त्यानंतर पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पा अंतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर पूर्ण केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या