संभाजीनगरात गॅस्ट्रोचे आणखी हजार रुग्ण

32

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

दोन दिवसांपासून छावणी भागात हाहाकार उडवून देणाऱया गॅस्ट्रोचा उद्रेक सुरूच असून सोमवारी हजार रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढतच असल्याने छावणी परिसर गॅस्ट्रोच्या दहशतीखाली आला आहे. दरम्यान, आतापर्यंत २ हजार रुग्णांना लागण झाल्याची नोंद छावणी आरोग्य केंद्रात झाली आहे.  सोमवारी तिसऱया दिवशीही जवळपास हजार रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती छावणीचे डॉक्टर विनोद धामदे यांनी दिली. छावणी भागात शुक्रकारपासून गॅस्ट्रोने थैमान  घातले आहे. तीन दिवसांपासून दरदिवशी गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागही हतबल झाला आहे. या गॅस्ट्रोवर नियंत्रण मिळावायचे कसे, असा प्रश्न उभा असतानाच सोमवारी पुन्हा हजार रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.

संपर्कप्रमुखांसह खासदार व महापौरांची भेट

संभाजीनगर जिह्याचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता किकास जैन, सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, शहरप्रमुख विजय वाकचौरे, छावणीचे उपाध्यक्ष संजय गारोल, छावणी सदस्य हनिफ शेख आदींनी छावणी परिषदेच्या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. त्याचप्रमाणे नेमके कारण शोधण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश खासदार खैरे यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या