सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी

9

सामना ऑनलाईन। कोलकाता

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला जीवे मारण्याची धमकी लिहलेल पत्र मिळाल आहे.याप्रकरणी सौरव याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस पत्र लिहणा-याचा शोध घेत आहेत.

सौरवला ७ जानेवारीला हे पत्र मिळाले आहे. यात सौरवला १९ जानेवारीला पश्चिम बंगालमधील मिदीनीपूर जिल्ह्यातील विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभाग न घेण्याचे बजावण्यात आले आहे.त्यानंतर सौरवने या पत्राबददल कार्यक्रमाच्या आयोजकांनाही कळवलं आहे. दरम्यान, या कार्यक्रमास हजर राहण्यासंबंधी अजून विचार केला नसल्याचे सौरवने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या