सरकारविरोधात बोलशील तर ठार मारू, आमदार बच्चू कडू यांना धमकी

214

सामना ऑनलाईन । मुंबई

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे आमदार बच्चू कडू यांना सरकारविरोधात बोलशील तर ठारू मारू अशी धमकीच देण्यात आली आहे. रविवारी रात्री मुंबईहून अमरावतीला रेल्वेने निघाले असताना बच्चू कडू यांना मोबाईलवरून ही धमकी देण्यात आली असून याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

आमदार बच्चू कडू यांना ज्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली तो मोबाईल फोन तेव्हापासून बंद करण्यात आला आहे. तुम खुद को नेता समझते हो क्या? सरकार के खिलाफ जादा मचमच मत करो, नही तो मारा जाओगे, ज्यादा कुछ करोगे तो ठोक देंगे, अशा भाषेत बच्चू कडू यांना धमकावण्यात आले आहे. याप्रकरणी बच्चू कडू यांनी अमरावती जिह्यातील परतवडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून भादंवि ५०६ आणि ५०७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या