एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

सामना ऑनलाईन । नगर

नगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे तलावात एकाच कुटुंबातील तीन भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. इस्माईल शेख (20), नावेद शेख (16) मोईन शेख (14) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिरालगत असलेल्या एका शेतातील शेततळ्यात पोहण्यसाठी गेले होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन भावांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या