खालापूरजवळ अपघात, तीन ठार

सामना ऑनलाईन । खालापूर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (मुंबई-पुणे एक्सप्रेस वे) खालापूरजवळ आज (शनिवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका कारला झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. खालापूरच्या फूड मॉलजवळ दुपारी हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार मुंबईच्या दिशेने येत होती. या कारने पाण्याच्या टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात पनवेल येथील कुमार ओसवाल आणि त्यांची पत्नी व मुलगी जागीच ठार झाले. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कार बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

आपली प्रतिक्रिया द्या