तीन फूटाचा नवरा, चार फूटाची बायको; लॉकडाऊनमध्ये झाले हे अनोखे लग्न

1863

देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील अनेकांची लग्न देखील लांबणीवर पडली आहे. अनेकांना अक्षरश: दोन दिवसांवर आलेलं लग्न रद्द करून पुढे ढकलावं लागलं आहे. अशातच आज धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक अनोखे लग्न पार पडले.

चार फूट उंचीच्या नयना हिचा निवाह साडे तीन फूट उंचीच्या झामरु राजेंद्र कोळी सोबत पार पडला. नयना ही 19 वर्षांची असून राजेंद्र 29 वर्षांचा आहे. झामरु हा दहावीपर्यंत शिकलेला असून नयनाने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. या दोघांनी गावात साध्या पद्धतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत लग्न केले.

आपली प्रतिक्रिया द्या